१८. बालदिन विशेष
आदरणीय चाचा नेहरू, कालच बालदिन झाला. बालपण आणि बालमन आधी पासूनचे आकर्षण. प्रत्येकाच्या आयुष्यात असा दिवस येतो जेव्हा आपल्याला बालपणीचे किस्से आठवतात. नकळत कोणामध्ये तरी ते रंगवले जाते आणि निसटून गेल्याची जाणीव होते. तेव्हा ते पुन्हा अनुभवण्यासाठी एक हक्काची जागा म्हणजे शाळा, त्यातला ही आपला वर्ग किंवा अशाच लहान मुलांनी भरलेला मळा. सगळेच रमतात. क्वचित कधी अपवाद असतात. ते ही कधीतरी बदलतात. अशा रंगीत संगीत मुलांच्या मळ्यात उद्याची स्वप्न रंगवली जातात. आधी कुटुंबाची आणखी पुढे जाऊन सुशिक्षित समाजाची. कदाचित तुम्हाला ही तसेच वाटत होते. आज हे पत्र मी एक विद्यार्थीनी म्हणून लिहिते. वयाने, अनुभवाने कितीही मोठे झालो तरी शिकणे सुरूच असते. तेव्हा विद्यार्थिनीच. बालदिन म्हणले की आज ही हा दिवस त्याच उत्साहात अनुभवता येतो तो शाळेत आणि वर्गा - वर्गात. ए. पी. जे अब्दुल कलामांनी याच उत्साही उमद्या मुलांना आपले लक्ष केले आणि आपले नाव त्या हर एक मुलांच्या जिभेवर आणि मनावर कोरले गेले. मागे ठेवलेली ही अमूल्य संपत्ती पुढे चि...