३२. येशील ना ...
रस्त्यात जाताना अचानक तिचा धक्का लागला. मागे वळून पाहिले, तिला बोलणार इतक्यात ती गायब झाली. नंतर ती दिसलीच नाही. रात्री शतपावली करण्यासाठी जेव्हा मी बाहेर पडले. तेव्हा अचानक नजर आकाशाकडे गेली. आकाश भरलेले होते. काळोखाने. चांदण्यांनी. त्यात एक चमचमणारा तारा. तो तारा बोलू लागला, मला तिच्याबद्दल सांगू लागला, ती मला रस्त्यात भेटली होती ना तिच्याबद्दल. " हो ... ती " मी " च होते. तुझ्यातली " मी " तुला दुरून पाहत होते. तुझ्या समोरची आव्हाने पाहत होते, तूझे दुःख , आनंदाचे क्षण पाहत होते. तुझी स्वप्न पाहत होते, तुझी केविलवाणी धडपड पाहत होते. तुझ्यात पेटलेली आत्मसन्मानाची ज्योत पाहत होते. तुझे प्रश्न आणि प्रति उत्तरे पाहत होते. तुझ्याच आजूबाजूला राहून मी तुला पाहत होते. आकाशातला तो एक चमकणारा छान उठून दिसतो गं. पण जर सगळे आकाश च तार्यांनी चमकणारे झाले तर... बाजूला बघ किती अंधार आहे, ज्यात माझे विश्व लपलेले आहे. तो एक तारा तू आहेस. तो तारा चमकतोय पण बाजूला अंधार आहे त्यात मी आहे. आज मला तुझी गरज आहे. तुझ्यातलीच मी आहे. माझ्याशी स्पर्धा करू नको. फक्त ...