३७. मागे सोडलेले शहर
नव्या प्रवासाचा आनंद आणि नव्या ठिकाणच्या आठवणी तयार करायला कोणाला नाही आवडत ? नव्या गावा जाताना आपण एक गोष्ट मनात कायम साठवून ठेवतो. ते म्हणजे मागे सोडलेले शहर. तोच प्रवास दूरचा आणि बऱ्याच दिवसांचा असेल तर त्या मागे राहिलेल्या शहराची जागा ट्रंकेत ठेवलेल्या मौल्यवान खजिन्यासारखी आपल्या मनात राहते. तिथले रस्ते, चौक, तिथल्या इमारतीची नाव, दुकानांची नावे सगळ्याच आपल्यासाठी महत्वाच्या खुणा होऊन जातात. अगदी साधी चहाची टपरी सुद्धा तेव्हा आपल्याला त्या काळात घेऊन जाते. आपण दूरच्या प्रवासाला निघतो तेव्हा खर तर या मागे सोडलेल्या शहराची आपल्याला वर्षानुवर्षे मिळालेली सोबत आठवते. आपल्या कुटुंबाला कुशीत घेणारे ते शहर आपला जिव्हाळ्याचा विषय होऊन जातो. ते शहर जरी आपल्याला विसरले तरी त्या शहराला आपण कधीच विसरत नाही आणि त्या शहरासाठी एक पत्र लिहावे असं कुठे तरी वाटून जातं. माझ्या शहरासाठी लिहिलेलं हे पत्र, शहरातल्या आठवणी. मी जसे म्हणले, हे शहर माझ्यासाठी ट्रंकेतला खजिना आहे. जो पुढच्या पाच दहा वर्षांनी मी पुन्हा खोलून पहिला तरी तो तेव्हा ही तसाच असणार. काळ बदलला असेल, पण का...