Posts

Showing posts from August, 2024

३५. फुलपाखरू

Image
तिला लिहिलेलं पत्र  तिला आलेत आता आकर्षक फुलपाखरांसारखे सुंदर पंख. तिच्या भोवतालच्या सगळ्यांनी पाहिले. तिच्या जवळच्या, दूरच्या सर्वांनी पाहिले. क्षणभर कौतुक झाले. आनंद झाला. पुढच्या काही दिवसात अशाच एका फुलपाखराच्या पंखाना दूरच्या कोणी पाहिले. सुंदर रंग आवडले म्हणून छाटून टाकले. फुलपाखरू पुन्हा दिसले नाही. हे ऐकल्यावर आता तिच्या पंखाचे कौतुक नाही. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा त्या फुलपाखराने का द्यायच्या.. ? तिला कळलेले  स्वातंत्र्य वेगळे आहे. आपल्यातल्या स्वतः ला  ती जपायला लागली आहे. तेच कदाचित तिला कळलेले स्वातंत्र्य  -  जुई✍️