Posts

Showing posts from September, 2021

१६. बाप्पाचं पत्र

Image
        सकाळ सकाळी whatsapp वर नोटिफिकेशन आलं होतं. Unsaved नंबर वरून एक भला मोठा मेसेज. लेख, कथा नव्हे पत्र...कोणाचं? पत्रात लिहिलं होतं... कशी आहेस गं " best friend " ?... वाचून मी पण आश्चर्य चकित, पुढे काय लिहिले होते माहितीये...मी वाचतच राहिले.        किती दिवसापासून मी तिथे तुझ्या वहीच्या मागच्या पानावर बसून होतो. किती तरी वेळा ते पान उघडून तू बरंच काही म्हणाली असशील. हसली असशील, रडली असशील. पूर्ण वही भरली तरी फक्त त्या शेवटच्या पानासाठी ती वही तू हाताशी ठेवलेली. सकाळी, रात्री, मध्यरात्री कधीही आठवण आली की उघडून बसतेस. तुला समजवायच्या आधीच मग ती वही बंद करून बाजूला ठेवून देतेस. मी ऐकतो आणि तुझं सगळं!       म्हणलं आजपर्यन्त ऐकलेले त्यात लिहिलेले सगळ्याची तुला उत्तर तरी द्यावी. तू त्या वहीसोबत हे हिरवं अँप पण वापरते. लाल पोस्टाची ती टाळे लावलेली पेटी आज काल या रंगीबेरंगी अँप्स मध्ये बदलली आहे. मग म्हणलं त्या लाल पेटीची वाट न पाहता या सुपर फास्ट हिरव्यागार अँप वरच माझं पत्र पाठवतो.       आधी लहानपणी...