२०. सोबत
प्रिय मित्र मैत्रिणींनो... माझ्या सर्व अशा मित्र मैत्रिणींसाठी मी आज काही लिहिणार आहे ज्यांनी काही ना काही कारणामुळे आपल्या आयुष्यातली अगदी जवळची व्यक्ती गमावली आहे. आज लिहिताना अशा असंख्य लोकांना मी पाहते, वाचते जे एकट्याने आयुष्य घालवत आहे. ज्यांना त्यांच्या भूतकाळातील " सोबत " जीवघेणी वाटते. तर कधी तरी तशी " सोबत " मिळण्याची अपेक्षा सतत डोकावत राहते. असे जीवन म्हणजे कदाचित " मृगजळ " किंवा लहानपणी ऐकलेली " जादूची छडीच " जी अकस्मात आपल्या भावना बदलते. ओळख बदलते आणि दिवस ही बदलते. अशा वेळी ते मृगजळ पकडण्यासाठी केलेली धडपड अपेक्षाचा खूप मोठा डोंगर समोर उभा करते. हे अगदी सर्वांसाठी सारखे असू शकते. किंवा विरोधी असू शकते. समीकरण जुळते न जुळते गोष्टी हाताबाहेर जातात. अशा वेळी दोष तरी कोणाला द्यावा आणि कोणाला सांगावे अशी मनस्थिती होणे अगदी साहजिकच. यावर थोडा विचार केला तर मला वाटते, कधी कधी आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती कधी कधी टिकवून ठेवण्याची स्पर्धा मनात सुरू असते. ती कधी कधी बदलणाऱ्या मानसिकतेला जबाबदार असू शकते. जी आजच्या युगात कामासाठी, प्रगतीसा...