Posts

Showing posts from August, 2020

१२. डिजिटल आम्ही तुझी लेकरे

प्रिय स्मार्ट फोन,      जेव्हा पासून तू माझ्या हातात आला आहेस ना, माझ्यातला स्मार्टनेस मातीत पाणी मुरावे तसा तुझ्यात कधी मुरत गेला कळले ही नाही. सुरवातीला माझे व्यक्तिमत्व आणि माझी ओळख म्हणले की पटापट पाठ केलेल्या ओळी तोंडून निघायच्या. पण आता हा आवड, निवड आणि स्वभावाची चांगलीच ओळख करून देतो. आधी किमान बटणे दाबायचे तरी कष्ट होते आता ते ही नाही. अंगठा लावा किंवा आपलाच चेहरा त्यात आरसा समजुन पहा. तो अलिबाबाच्या गुहेसारखा उघडतो. आणि जवळ जवळ सगळेच साठवून ठेवतो. आता चेहऱ्यावर अचानक एखादा डाग जरी आला तरी आरशाची गरज लागत नाही.  तो ही हळूहळू दुरावत गेला. एक एक रेष निरखून तुझ्यात ती मिटवता ही येते आणि वाढवता ही येते. वेगवेगळ्या रंगाची, आकाराची फिल्टर असतात ना तुझ्यात. गाळणी किंवा चाळणी सारखे सगळे चित्र एका क्षणात बदलतात. कदाचित " डिजिटल ब्युटी " म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. असा हा एवढासा चतुर फोन. काम अगदी वाऱ्याच्या वेगाने करू ही शकतो आणि बिघडवू ही शकतो.       लाईव्ह आपण दिसतो म्हणे तुझ्यात. याचा फायदा असेलच पण त्यात गंम्मत आणि फजिती ही आपली पाठ सोडत नाही....

११. प्रिय स्माईल

Image
प्रिय smile,      टेबल वर ठेवलेला हॅप्पी मॅन डुलताना पाहून आज डोक्यात एक विचार आला. बऱ्याचदा आपण ऐकलं असेल, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे किती अवघड. काहींना ही कला जन्मजात अवगत असते आणि खरच हे अवघड काम करणारा खरं तर अवलियाच असतो. मग तो आपला मित्र किंवा मैत्रीण असो किंवा साधा टेबलवरचा हॅपी मॅन...!     आता एवढ सगळं हसण्यावर आणि हसवण्याच्या कलेवर बोललं मग रडण्यात ते कसलं सुख...! कोणाला आवडेल रडायला आणि रडवणाऱ्या व्यक्तीशी बोलायला.       मी स्वतः आनंदी रहा असे सहज मेसेज अनेकदा अनेकांना देते. तुम्हीही दिले असतील आणि ते पुरे पूर आमलात ही आणतो आपण. कोण ' रडत राहा ' असं का बरं बोलेल ? आपला हितचिंतक कधीच असे बोलणार नाही. तरीही कोणत्यातरी कारणाने आपण कधी तरी रडतोच. हो ना...!    कधी आपली या जगात नव्या आयुष्याची सुरवात होताना पहिलं वहिल रडणं आणि त्याचा झालेला जल्लोष असो किंवा या जगातून जाताना आपल्यासाठी इतरांच्या डोळ्यात वाहणाऱ्या आठवणी. या जीवन मरणाच्या चक्रामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या सुख दुःखात आलेले अश्रू काही नवीन नाही. ...