Posts

माझे आवडते शिक्षक

लहानपणी मी पहिल्यांदाच सायकल शिकत असताना जेव्हा पडले. तेव्हा रस्त्यातले खड्डे आणि चुकीची दिशा एवढेच कारण होते. पण तेव्हा सायकल चालवताना कुठे पडण्याची शक्यता आहे? कुठे काळजी घ्यायची? हे समजले. माझ्यासाठी शिक्षक म्हणजे काय? हे समजायला तिथूनच  सुरुवात झाली.  मी "आवडता" या विषयावर लिहायला घेतले आणि नावडता विषय आपसूक आलाच. ज्या ज्या गोष्टी पूर्वी नावडत्या वाटत होत्या. ज्या विषयांची भीती असायची, त्याला सोपे करून देणारा व्यक्ती तो आवडता शिक्षक हे सहज समीकरण झाले. बीजगणित, भूमिती, इतिहासातील इसविसने, भूगोलातील नकाशे, अर्थ शास्त्र, रसायन शास्त्र त्यानंतर हळूहळू समजत गेलेले समाज शास्त्र. मला या आणि अशा वेगवेगळ्या पेचातून बाहेर काढण्यासाठी त्या त्या वेळी भेटणारी माणसे कालांतराने आवडती होत गेली. मी ही कोणासाठी आवडती शिक्षिका होऊ शकते ही प्रेरणा जिथून घेतली. माझ्या कोऱ्या पाटीवर ज्यांनी सर्वोतम गिरवायला शिकवले. ती प्रत्येक व्यक्ती आवडती झाली. शिकण्याच्या या प्रवासात सारी भेटत गेली. त्यामुळे हा प्रवास आणखी सुंदर झाला, आठवणींनी समृद्ध झाला.  - जुई

४३. ती असते ...

Image
" ती घरीच असते " दोघातले संभाषण तिच्यासाठी, तिच्याबद्दल किंवा अशा असंख्य गृहिणींना. गृहिणी हा शब्द त्यातल्या त्यात वरच्या वर्गातला. ती नक्की कशी असते? ती काय करते ? ती कशी सांभाळते ? हे तिच्या जागी आपण येतो तेव्हा कळते. तिचे घरीच असणे कुणा कुणासाठी खुप काही असते. त्यावर हे लिहिलेलं पत्र. तिच्यासाठी.  जाणते झाल्यावर आपण हळूहळू कमावते होतो. बाहेरचे आकर्षक ,आभासी विश्व आपल्याला खुणावत असते. स्वतंत्र विचार आपल्याला झपाटून टाकत असतात. वेगवेगळी प्रलोभने समोर येत असतात. बाहेरच्या अनुभवांनी आपण समृद्ध होत असताना आपली वाट पाहणारी ती घरीच असते. वेगवेगळे मुखवटे लावून जगाला सामोरे जाताना आपण दुखावले जातो. फसतो आणि फसवतो. पण या मुखवट्या मागची दमछाक पाहणारी ती आपली घरी वाट पाहत असते. खूप काही मनात असते, कोणाकडे तरी ही तगमग रिती करायची असते, ऐकणारे कोणी तरी हवे असते तेव्हा आपल्या मृदू स्पर्शाने हे वादळ शांत करणारी ती घरीच असते. तिथे ती नसेल तर... ती घरी असते, तेव्हा एक छत आणि भिंती बोलू लागतात, हसू लागतात, आनंदी होतात. ती घरी नसलेले घर सुद्धा तिची वाट पाहत असते. ते घर तिच्या असण्यातला मायेच...

३९.नवदुर्गा

Image
नवदुर्गा आपण शक्ती स्थान म्हणून मानतोच, पण आपल्या आजूबाजूला ही अशी शक्ति स्थान आहेत. आपण कधी शोधण्यासाठी निघालो तर नक्कीच या नव दुर्गा आपल्याला प्रवासात भेटतील. हा शोध आहे आपल्यातल्याच नवदुर्गाचा. ज्यांना गरज आहे नव्या जोमाने पुढे येण्याची. गरज आहे, स्वतःला नव्याने जाणून घेण्याची. गरज स्वतःला सिद्ध करण्याची, एक संधी देण्याची. चला तर हा प्रवास करूया, एक प्रवास तिच्यासाठी. तिच्यातल्या लक्ष्मीला शोधण्यासाठी. तिच्यातल्या सरस्वतीला शोधण्यासाठी. तिच्यातल्या रणरागिणीला शोधण्यासाठी. आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या या शक्तिला वंदन करण्यासाठी ... एक प्रवास तिला शोधण्यासाठी ...   - ©®जुईली अतितकर

४०. सुरकुत्या

Image
काल रात्री झोपण्याच्या आधी आईने जवळ बोलवून डोक्याला ते करता करता तिचा हात माझ्या खांद्यावर आला. आधार तिचा मला की माझा तिला हा संभ्रम होता. तेव्हा तिचा हात हातात घेतला आणि म्हणलं " सुरकुत्या दिसू लागल्यात ग आई हातावर.... " त्यावर ती म्हणाली " अग या सुरकुत्या म्हणजे माझ्या आयुष्यात आलेली वेगवेगळी माणसे आहेत. अनुभवाच्या प्रवासात ती माणसे क्षणिक ही असतील कदाचित पण या सुरकुत्या त्याची निशाणी आहे. त्या जपायच्या आणि कायम सोबत ठेवायच्या.  - ©®जुई

४१.वाचणे

Image
आपल्या आजूबाजूला तऱ्हे तऱ्हेचे लोक वावरत असतात. काहींना सवय असते आपले अनुभव कोणा ना कोणाला सांगायची. आपला आनंद कोणासोबत तरी वाटून घेण्याची. आपल्या अडचणी, आपले दुःख कोणासोबत तरी share करण्याची. प्रत्येकाच्या वेगळ्या पद्धती, वेगळी माणसे, वेगळे पुस्तक. एकदा एका मुलीने मला प्रश्न विचारला " आपल्या मनातल्या गोष्टी प्रत्येक वेळी कोणाला तरी सांगणे गरजेच असतं का ? " कॉलेज वयीन मुलीचा तो प्रश्न खरं तर फार महत्वाचा होता. तेव्हा तिला थोडक्यात सांगावे म्हणून एक उदाहरण दिले " आपल्या मनातल्या गोष्टी कधी कधी आपल्यासाठी फार महत्वाच्या होतात. कधी त्या चुकीच्या की बरोबर हे आपल्याला ही कळत नाही. आपल्याला कळत नसेल तर त्या योग्य व्यक्तीला सांगणे गरजेचे असते. कधी कधी काही गोष्टींची आपल्याला निवड करावी लागते. कधी आपले अंदाज चुकू शकतात अशा वेळी मनातलं द्वंद्व अशा ठिकाणी रिते करते योग्य ठरते, जिथे त्याला उत्तर मिळेल, दिशा मिळेल. " जसं की समजा आपल्याला एखादे गणित सुटत नसेल आणि त्याचे उत्तर हवेच आहे, तर ते आपण उत्तर इतिहासाच्या पुस्तकात शोधले तर उत्तर मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला गणिताचे प...

३८. शंभू राजा

Image
आदरणीय शंभू राजा,   आजच्या घडीला आधुनिक जगात वावरणारा मी तुझा एक सामान्य मावळा, पुन्हा एकदा मी तुला मोठ्या पडद्यावर पाहून आलो. छत्रपतींचे स्वराज्य पुन्हा एकदा पाहून आलो. तू आलास माझ्या स्वप्नात आणि मला खुद्द विचारलेस, तू काय काय पाहिलेस रे ?  माझा कागद समोर तयार होता, भरभर लिहू लागलो,  " आईची माया, वडिलांची छत्र छाया काय असते ?  स्वराज्यासाठी स्वेच्छेने जमलेली रयत. स्वातंत्र्यासाठी बांधलेली मूठ पाहून आलो. रयतेतल्या हर एक मावळ्यांनी रचलेला स्वतःचा एक इतिहास, मोहरापेक्षा ही मौल्यवान वाटावे एवढे प्रगल्भ बोलणे. हत्यार नसताना बुद्धीने लढण्याचा गनिमी कावा,  सारे सारे वैभव जपण्यासाठी उभारलेली दगडी विश्वासू तटबंदी तसेच विश्वासू मंत्री मंडळ, प्रजेला समर्पित झालेल्या राजाचा तो इतिहास... काय काय पाहून आलो याचा विचार केला आणि  आठवलं तुझ्या साऱ्या जखमांवर हळहळणारे, पहिल्या रांगेत बसलेले ते आजी आजोबा, ज्यांनी इतिहास त्या वेळी पाहता पाहता जगून ही घेतला. " जय भवानी " चा नारा देणारे, तुला पाहायला आलेले पिटुकले हात पाहिले, तुला जखमा होताना त्यांचे ही हात काप...

४२. देणे

Image
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे ही विं. दा करंदीकर यांची सुप्रसिद्ध कविता ज्या विषयावर भाष्य करते ते आपल्या जगण्यातले मर्म, देणारे दोन हात... दातृत्व देण्याची ही भावना निसर्गतः खर तर प्राणी मात्रामध्ये रुजलेली आहे. आपण या सृष्टीचा एक भाग म्हणून वावरताना खर तर प्रत्येक श्वासा साठी या निसर्गाचे देणे लागतो. ही एक आणि अशा असंख्य गोष्टी नकळत पणे आपल्या रोजच्या जगण्यात सहज येतात ज्याची जाणीव ही आपल्याला नसते. ही निसर्गाने रुजवलेली भावना असून ही आपल्या मनात लोभ आणि हव्यास कसा निर्माण करून जाते ?  म्हणजे सतत मिळणाऱ्या या गोष्टीला पूर्ण विराम लागतो तेव्हा च का त्याची जाणीव व्हावी?  कोरोना महामारी चे चित्र पाहता सगळ्यात मोठी झळ ही मनुष्याला झाली ज्यात त्याला या हवेतल्या " प्राण " वायूची किंमत मोजावी लागली. देणारा निसर्ग अचानक आपले श्वास घेणारा झाला. अतिसंचयाने जशी गरीबाच्या फाटक्या झोळीमुळे माती होते तशी गती आपली तर होत नाही ना ?  तेव्हा आपल्याला जशी एखाद्या गोष्टीची गरज भासू शकते तशीच ती इतर कोणाला तरी असू शकते. अशा गरज वंताला देणार...