Posts

Showing posts from March, 2025

३९.नवदुर्गा

Image
नवदुर्गा आपण शक्ती स्थान म्हणून मानतोच, पण आपल्या आजूबाजूला ही अशी शक्ति स्थान आहेत. आपण कधी शोधण्यासाठी निघालो तर नक्कीच या नव दुर्गा आपल्याला प्रवासात भेटतील. हा शोध आहे आपल्यातल्याच नवदुर्गाचा. ज्यांना गरज आहे नव्या जोमाने पुढे येण्याची. गरज आहे, स्वतःला नव्याने जाणून घेण्याची. गरज स्वतःला सिद्ध करण्याची, एक संधी देण्याची. चला तर हा प्रवास करूया, एक प्रवास तिच्यासाठी. तिच्यातल्या लक्ष्मीला शोधण्यासाठी. तिच्यातल्या सरस्वतीला शोधण्यासाठी. तिच्यातल्या रणरागिणीला शोधण्यासाठी. आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या या शक्तिला वंदन करण्यासाठी ... एक प्रवास तिला शोधण्यासाठी ...   - ©®जुईली अतितकर

४०. सुरकुत्या

Image
काल रात्री झोपण्याच्या आधी आईने जवळ बोलवून डोक्याला ते करता करता तिचा हात माझ्या खांद्यावर आला. आधार तिचा मला की माझा तिला हा संभ्रम होता. तेव्हा तिचा हात हातात घेतला आणि म्हणलं " सुरकुत्या दिसू लागल्यात ग आई हातावर.... " त्यावर ती म्हणाली " अग या सुरकुत्या म्हणजे माझ्या आयुष्यात आलेली वेगवेगळी माणसे आहेत. अनुभवाच्या प्रवासात ती माणसे क्षणिक ही असतील कदाचित पण या सुरकुत्या त्याची निशाणी आहे. त्या जपायच्या आणि कायम सोबत ठेवायच्या.  - ©®जुई

४१.वाचणे

Image
आपल्या आजूबाजूला तऱ्हे तऱ्हेचे लोक वावरत असतात. काहींना सवय असते आपले अनुभव कोणा ना कोणाला सांगायची. आपला आनंद कोणासोबत तरी वाटून घेण्याची. आपल्या अडचणी, आपले दुःख कोणासोबत तरी share करण्याची. प्रत्येकाच्या वेगळ्या पद्धती, वेगळी माणसे, वेगळे पुस्तक. एकदा एका मुलीने मला प्रश्न विचारला " आपल्या मनातल्या गोष्टी प्रत्येक वेळी कोणाला तरी सांगणे गरजेच असतं का ? " कॉलेज वयीन मुलीचा तो प्रश्न खरं तर फार महत्वाचा होता. तेव्हा तिला थोडक्यात सांगावे म्हणून एक उदाहरण दिले " आपल्या मनातल्या गोष्टी कधी कधी आपल्यासाठी फार महत्वाच्या होतात. कधी त्या चुकीच्या की बरोबर हे आपल्याला ही कळत नाही. आपल्याला कळत नसेल तर त्या योग्य व्यक्तीला सांगणे गरजेचे असते. कधी कधी काही गोष्टींची आपल्याला निवड करावी लागते. कधी आपले अंदाज चुकू शकतात अशा वेळी मनातलं द्वंद्व अशा ठिकाणी रिते करते योग्य ठरते, जिथे त्याला उत्तर मिळेल, दिशा मिळेल. " जसं की समजा आपल्याला एखादे गणित सुटत नसेल आणि त्याचे उत्तर हवेच आहे, तर ते आपण उत्तर इतिहासाच्या पुस्तकात शोधले तर उत्तर मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला गणिताचे प...