Posts

Showing posts from August, 2023

२८. स्वप्नांच्या पलीकडे

Image
गाढ झोपेत असताना असे होते ना कधी कधी. आपण एक प्रवासी होऊन जातो. चालता चालता आपण काल्पनिक जगात इतके रमून जातो की आपल्याला आपल्या गाढ झोपेचा ही विसर पडतो आणि या स्वप्नातल्या प्रवासाला लागतो. स्वप्न पडतात पारिजातकाच्या फुलांप्रमाणे, स्वप्ने पळतात वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगात. स्वप्ने दिसतात दूरच्या मृगजळा सारखी. स्वप्ने बोलतात मनातलं कधी तरी. स्वप्ने असतात सतत सोबत जिवलगाप्रमाणे.  सांगत असतात काही तरी. बोलणारी स्वप्न लक्षात राहतात कायमची. अरुंद वाट, खाच खळगे, वळणे आणि आडवळणे सारे सारे येतात स्वप्नात. या स्वप्नातल्या प्रवासात चालता चालता माझ्या पायाशी आलेला एकदा एक कागद. जुना, जीर्ण झालेला, दुमडून ठेवलेला. ओळखीचा. नजरचुकीने तो मागे गेला, पण पुढे चालता चालता त्याचा आपल्या पायाला झालेला स्पर्श विसरता आला नाही. मी मागे वळून पाहिले. कागद फार लांब नव्हता गेला. मागे जाऊन त्या कागदाची घडी उघडली.  उत्सुकतेने त्यातले वाचले ही. त्यात लिहिलेलं एक पत्र. ओळखीचे शब्द आणि अक्षर. थोडं वाचल्यावर कळलं ते मी लिहिलेलं पत्र होतं. काही वर्षांपूर्वी काही ठरवून, काही समजून, काही नवं नवं समोर ठेवून लिहिलेलं...