१३. पानगळ
आज ऑफिसमधून निघताना नेहमी प्रमाणे हात सेनीटायसरने स्वच्छ केले. मास्क लावला आहे माहीत असून ही पुन्हा त्याची ही शहानिशा केली. सोबतच्या मैत्रिणींनी ही पुन्हा आठवण करून दिली. या स्वच्छता मोहिनेनंतर मी माझ्या घरच्या वाटेला आणि माझ्या मैत्रिणी त्यांच्या वाटेला वळले. थोड्याच अंतरावरून ऑटो मध्ये बसले. ऑटो ही प्रोटेक्शन प्रूफ वाटत होती. पुढे बसलेला चालक आणि मागचे पॅसेंजर यात मोठी प्लास्टिकची भिंतच होती. ज्यातुन आवाज ही पलीकडे जात नव्हता आणि हे ही मी त्या ऑटोमधून उतरताना जाणवले. जेव्हा मी माझे उतरण्याचे ठिकाण आल्यावर ही दोनदा सांगून त्यांनी त्या प्लास्टिकच्या भिंतीवर हात मारल्यावरच रिक्षा थांबवली. मी आणि माझ्या सोबत एक सावळीशी महिला आणि तिची चार वर्षाची मुलगी बसले होते. ती महिला कामावरून सुटून आलेली मजूर असावी. तिच्या माझ्या मध्ये तीची मुलगी बसलेली. ती ही थोडी सावळीशी आणि बुटकी. एका हातात स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आईस्क्रीम आणि दुसऱ्या हातात चमचा. मास्क लावला तो ही हनुवटीला. थंडीचे दिवस आणि बाहेरचा गारठा पाहता आईस्क्रीमचा मो...