Posts

Showing posts from February, 2024

३१. माय मराठी

Image
" मी मराठी बोलतेय " "आज मी तुम्हा सर्वांशी बोलण्यासाठी आले..." " मनामनात निपजणारी, सहज ओठांवर रुळणारी... माय मराठी... " "खर सांगू का ! कॉलनीच्या कट्ट्यापासून ते गावाच्या शिवारा पर्यन्त माझ्या जवळ असणारी तुम्ही सारी माणसे मी पहिली ना तेव्हा ही माय खुश झाली. " “आज जेव्हा मी बघते की, मोबाईलच्या कि पॅड पासून ते अगदी पौराणिक ग्रंथापर्यन्त माझा वापर केला जातो तेव्हा बरं वाटतं.”  “मी अनेक पिढ्या पाहिल्या व त्या पिढ्यानी माझा कसा वापर, आदर, जपणूक केली ते पाहात आले.” " सार्वजनिक ठिकाणापासून ते घराच्या चार भिंतीमध्ये माझं असणं मला जाणवलं ना...तेव्हा माझा उर  भरून आला. "  " औद्योगिक क्षेत्रापासून ते साहित्यिक प्रवाहात मी स्वतः ला पाहिले, तेव्हा मला माझी व्याप्ती जाणवली. " " आज मी शाळेतल्या एका वर्गात गेले, तिकडे बोबड्या शब्दात " ये रे पावसा... " सुरू होते. " " कुठे नव्वदीची आजी तेलवाती करता करता " रुणू झुणू रे भ्रमरा " अभंग म्हणत होती."  “आज काही तरुणांना पाहिले, ते त्यांच्या मोबाईलवर म...

३०. पत्रवाचन कट्टा

Image
रविवार , ११ फेब्रुवारी , ठाण्यात पत्रवाचनाचा कट्टा होता. विषय प्रेम. बऱ्याचदा असे होते ना, आपल्यातला स्नेह भाव आणि प्रेम व्यक्त करणे कठीण होते. तेव्हा पत्र हे एक त्यावर चांगले सोल्युशन होऊ शकते. औपचारिकतेच्या चौकटीत न राहता दिलखुलासपणे ते व्यक्त करण्यासाठी, पोहोचवण्यासाठीचे माध्यम त्या दिवशी ही पत्र झालेले.  कधी कधी एकमेकाच्या प्रति आपल्या भावना बोथट झाल्यात असं ही आपल्याला वाटतं असतं. अशा वेळी कुठल्या तरी निमित्ताने , कुठला तरी दुवा बनून किंवा कुठल्या तरी माध्यमातून आपल्याला तशी संधी मिळते. तेव्हा त्या चौकटीच्या बाहेर येऊन आपण बोलू लागतो, पत्रातून लिहू लागतो.  त्या दिवशी पत्राच्या माध्यमातून माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनी  पत्र वाचले, पोहोचवले. या कट्ट्याला उपस्थित मान्यवर लेखकांनी ही त्यांच्या भावना पत्रातून आम्हा तरुणांपर्यन्त पोहोचवल्या. प्रा. प्रज्ञा पंडित, श्री. सुनील शिरसाठ, श्री. राजेंद्र गोसावी, श्री. रामदास खरे यांच्या सोबत पत्राचा विषय वेगवेगळ्या दृष्टीकोनातून समोर आला.  बागेत जमलेला हा कट्टा एकमेकांच्या संवादातून, गप्पा मारत, एकमेकांना प्रोत्साहन देत,...

२९. प्रेमाचं पत्र

Image
माझी जवळची मैत्रीण प्रिय आई... हे पत्र लिहायला सुरुवात केली,  मी पत्रात प्रेम शोधत गेले आणि तिथे आपोआप तुझं माझं नातं मला दिसू लागलं. जन्माची चाहूल लागताच जर कुठलं प्रेमाचा वर्षाव करणार नातं आपल्याशी बांधलं जात असेल ना तर ते आईचे नाते.   माझ्याशी जोडले गेलेले हेच ते माझ्या आयुष्यात आलेले पहिले वहिले प्रेमाचे नाते. तुझे माझे नाते. चालता चालता अचानक लहान मुल रस्त्यात ठेचकाळतं ना, पडतं, रडतं, तिथे च थांबतं.   त्या त्या वेळी तू होतीस. तुझ्या हातात माझी मूठ घट्ट पकडलेली. जवळ घेऊन जेव्हा जेव्हा घट्ट मिठी मारलीस ना तेव्हा त्या दुखल्या खुपल्याचा आपसूक विसर पडला. तुझी प्रेमाची फुंकर आज ही बऱ्याचशा जखमांवर औषध होते, आई.  लहानपणी कुठे कळतं प्रेम म्हणजे नक्की काय ? हळूहळू कळणारा प्रेमाचा अर्थ म्हणजे फक्त आठवते तेव्हाची ती फुंकर आणि मिठी. आपल्या नात्याला जपणारी ती फुंकर नाउमेदीच्या दिवसात ही मला उमेदीने पुढे जायला शिकवते.  जाणते होत असताना, नवे मार्ग मोकळे होत असताना बरेचदा आपल्या पंखात बळ येते. तेव्हा मायेचा पिंजरा ही आपल्या मनात असतो, जो अडसर होऊ शकतो. अशा वेळी मोकळे आकाश ...