Posts

Showing posts from July, 2023

२७. मनाचा कौल

Image
कालच्या कळीचं आज सुंदर गुलाबी फुल झालेलं.  दोन पानांच्या मध्ये आलेलं ते गुलाबाचे फुल पाहायला नेमकं तेव्हाच फुलपाखरू तिथं आलेलं. ते फुल तेव्हा वाटलं ठेवावं आपल्या डायरीत. त्याच्या गुलाबी पाकळ्यांचा स्पर्श माझ्या शब्दांना होण्याचा हाच एक उत्तम मार्ग होता. थोडा वेळ त्याकडे पाहिले. वाऱ्यावर डुलणारे फुल पाहताना मनात विचार आला.  कधी कधी काही गोष्टी आपल्याला इतक्या आवडतात. मनात घर करतात. त्या आणखी सुंदर करण्यासाठी, बदलण्यासाठी आपल मन सतत त्याचा मागोवा घेत असतं. हट्टाने त्यात बदल उतरवत असतो. आपण याला बदलून टाकू. आणखी चांगलं करून बघू . चेहरा मोहरा बदलताना आपण एक गोष्ट विसरून जातो का ? या फुलांकडे जे झाडावरचे सौंदर्य आधीच आहे त्यात त्याला अधिकचे सौंदर्य हवे आहे का ? ते फुलपाखरू तसे ही आलेच की वाट काढत, त्या फुलाला शोधत शोधत. त्याच्या रंगाला सुंगधाला शोधत. किती ही आकर्षक दिसले तरी कृत्रिम फुलावर फुलपाखरे तर येणार नाहीत, त्यासाठी त्यात लपलेला जिवंतपणा हवा असतो त्यांना. तो कोण देते याला ? लाल मातीत, हिरव्या पानात च तो खुलून येत असेल ना ! काही वेळा ठरवून तयार केलेले रस्ते आपल्या...