३३.आवाज
आवाज ... पक्षांचे किलबिल आवाज, गजराचे आवाज, भोवतालच्या गोंगाटात हरवलेले आवाज, याचना करणारे आवाज, काळजाला हात घालणारे आवाज, कान उघडणारे आवाज, कधी सुई सारखे टोचणारे आवाज तर कधी कानावाटे मनाला मृदू स्पर्श करणारे आवाज. आवाजावर लिहिताना मनात काही प्रश्न आहेत ? ऐकणारे कान फारसे मिळत नाही, सांगणारे वेगवेगळे आवाज असतात. रोज एवढे कानावर आदळणारे आवाज बंद झालेच तर ... आवाजात काय जादू असावी की त्याचे विस्मरण होत नाही. कधी कधी ती व्यक्ती किंवा अन्य गोष्ट समोर नसली तरी आवाज मात्र कायम लक्षात राहतो. साद प्रतिसादाचे गणित त्यातून सहज सुटते. कधी कधी आवाज टोकदार, कर्कश किंवा नकोसे वाटतात. बोलणे, सांगणे आणि संवाद यांच्यातला फरक आवाजाने सहज कळतो. कधी कधी माझ्या बाबतीत ही असे होते. एखादी कविता लिहिता लिहिता सहज सुचते आणि पूर्ण ही होते, पण ती म्हणताना शब्दांचा अर्थ मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आवाजाचे तरंगणारे तराफे सोबत ठेवावेच लागतात. काही रचना मनात घर करतात पण खूपदा ते घर आवाजाच्या पायावर उभारलेले असते. प्रेम, माया, उत्कटता ही मनाची आंदोलने सरळ रेषेत म्हणली तर शब्द वाया ही जाता...