Posts

Showing posts from September, 2022

२२. कवितेच्या पलीकडे

Image
आदरणीय शांता शेळके, सायंकाळी क्षितिजावरती मंदपणे मी करते लुकलुक शांत राहुनी अपुल्या जागी भवतालचे बघते कौतुक अफाट वरती गगन पसरले विशाल खाली पसरे धरती मी सृष्टी ची सुता लाडकी चमकते क्षितिजावरती साहित्य सागरात शांता बाई तुमचे वर्णन करायचे झाले तर याहून वेगळे होणार नाही. कधी क्षितिजावरचा लुकलूकणारा तारा, तर कधी साहित्याच्या समुद्रात तटस्थ असलेला एक प्रकाश स्तंभ. आम्हा तरुणांसाठी  साहित्यिक नाव घेऊन विहार करणाऱ्या युवकांसाठी खोल साहित्य सागरात दिशा दाखवणारा दिशा दर्शक.  संधी प्रकाशात धावत्या घटनांचे आल्या गेल्याचे, कालचे, उद्याचे कौतुक सोहळे पाहताना एका ठिकाणी क्षितिजावर स्थिरावणारी नजर आणि चमकणारे काही आपलेसे वाटते. मन बुद्धी ला मागे टाकत सृष्टीच्या आनंदात आपला आनंद शोधू लागणारा मंद मंद तेजाळत जाणारा तिचा प्रकाश अढळ भासू लागतो. आणि त्याच प्रकाशात आपली एक शब्दाची जुळणी सुरू होते. ती ही क्षितिजाचा ठाव घेत घेत शांता बाईच्या शब्दांत गुरफटून जाते. समरस होते.  तुम्ही लिहिलेली प्रत्येक कविता, गीत, समीक्षण आज ही वाचताना ते माध्यम होते. संवादाचे आणि कथनाचे.  ज्याप्रमा...