Posts

Showing posts from May, 2025

४३. ती असते ...

Image
" ती घरीच असते " दोघातले संभाषण तिच्यासाठी, तिच्याबद्दल किंवा अशा असंख्य गृहिणींना. गृहिणी हा शब्द त्यातल्या त्यात वरच्या वर्गातला. ती नक्की कशी असते? ती काय करते ? ती कशी सांभाळते ? हे तिच्या जागी आपण येतो तेव्हा कळते. तिचे घरीच असणे कुणा कुणासाठी खुप काही असते. त्यावर हे लिहिलेलं पत्र. तिच्यासाठी.  जाणते झाल्यावर आपण हळूहळू कमावते होतो. बाहेरचे आकर्षक ,आभासी विश्व आपल्याला खुणावत असते. स्वतंत्र विचार आपल्याला झपाटून टाकत असतात. वेगवेगळी प्रलोभने समोर येत असतात. बाहेरच्या अनुभवांनी आपण समृद्ध होत असताना आपली वाट पाहणारी ती घरीच असते. वेगवेगळे मुखवटे लावून जगाला सामोरे जाताना आपण दुखावले जातो. फसतो आणि फसवतो. पण या मुखवट्या मागची दमछाक पाहणारी ती आपली घरी वाट पाहत असते. खूप काही मनात असते, कोणाकडे तरी ही तगमग रिती करायची असते, ऐकणारे कोणी तरी हवे असते तेव्हा आपल्या मृदू स्पर्शाने हे वादळ शांत करणारी ती घरीच असते. तिथे ती नसेल तर... ती घरी असते, तेव्हा एक छत आणि भिंती बोलू लागतात, हसू लागतात, आनंदी होतात. ती घरी नसलेले घर सुद्धा तिची वाट पाहत असते. ते घर तिच्या असण्यातला मायेच...