Posts

Showing posts from August, 2022

२१. अरुंद वाट

Image
             ऑफिसच्या रस्त्यात येणाऱ्या वाटेत एक छोटीशी बाग लागते. कधी कधी खूप कंटाळा आलाय असं वाटलं, की चाळणी सारखी ती वाट होऊन जाते. बरेचदा असं होतं की, त्या बागेतून पलीकडे जायचे असते. अगदी पाच ते सहा मिनिटांची ती अरुंद वाट असते. पण त्या पाच ते सहा मिनिटांत चेहऱ्यावरचा ठसठशीत जाणवणारा कंटाळा पालटून त्यावर उत्साहाचे, उत्सुकतेचे, प्रसन्नतेचे तेज जाणवते.          मनातून चेहऱ्यापर्यन्तचा हा प्रवास म्हणलं तर फार कठीण आणि मोठा असू शकतो. पण तेव्हा फक्त ते पाच ते सहा मिनिटांचे अंतर असते. हिरवा गच्च भरलेला एक रस्ता माझ्या वाटेतून जातो याचे नवल ही वाटते आणि कौतुक ही.  पुढचा प्रवास कसा असेल हे माहीत नसताना तो मधला दुवा पुढे जाण्याची माझ्या मनाची तयारी करतो. कधी धो धो पडणाऱ्या पावसात भिजलेला असतो तर कधी सुकलेल्या पानांच्या पायघड्या घातलेला.  अगदी मिनिटाभरासाठी नजरेस पडणारे काळ्या, निळ्या ठिपक्यांचे फुलपाखरू ही तेव्हा सुखद वाटते. त्याचे पंख कधी आपले पंख होतात कळत ही नाही. लहान मोठी फुलपाखरे तेव्हा मला आजवर भेटलेल्या ...