Posts

Showing posts from July, 2020

९. पिटुकला राक्षस

हॅलो,     बऱ्याच दिवसापासून डोळ्याला ही न दिसणारा मी पिटुकला राक्षस आपल्या सगळ्यांच्या चर्चेत आलो आहे.    कोणीतरी म्हणलं आहे, साईज वर जाऊ नका, थोडे सांभाळून राहा. याची पावलो पावली आठवण करून देणारा पिटुकला राक्षस.       मी राक्षस का म्हणलं माहिती आहे, कारण एकदम साधं सरळ आहे, काही वेळा लोकांना दगडातला देव दिसत नाही. पण माझ्या येण्याने या बिकट काळात देव ओळखायला शिकवले की नाही या राक्षसाने. त्यामुळे माझे येण्याचे कारण ही काहीतरी नियोजित असावं.        कोणी माझ्या येण्याचा योग पूर्वीच्या गीता, ज्ञानेश्वरी मध्ये लिहिल्याचे पुरावे आज दाखवते आणि त्यावर विश्वास लगेच बसतो. तो ठेवावा लागतो. माणस माणसाला या कलयुगात किती परकी होऊ शकतात आणि " कल " चा विचार करणारा एक माणूस या मायाजालात किती क्षुल्लक आहे हेच बहुतेक शतकापूर्वी त्या संत महंत्यांनी ओळखलं असावं.       आज जरी आपण चालते फिरते चक्र असलो पृथ्वीवरचे. तरीही हे चक्र कधीही थांबू शकते तेव्हा थोडे जगून घ्या, हेच ओरडत आला हा पिटुकला राक्षस.       आपल्या श्वासावरह...

८. एक डॉक्टरांचे पत्र

    आज खूप दिवसांनी रुग्णांच्या सेवेनंतर दोन तीन मिनिट बाहेरच्या कॉरिडॉर मध्ये फिरताना माझी नजर वर आकाशाकडे गेली त्यानंतर समोरच असलेल्या लाल दिव्याच्या खोलीकडे.           अचानक इथे ही महापूर आला माणसांचा. एक दोन वरून शे दोनशे वर माणसं  आली इथे. बरीचशी प्रयत्नानी  बरी होऊन घरी गेली. काहीनी त्या आकाशातला एक तारा होऊन इथेच अलविदा केले. तिथेच मी फिरताना एक मुलगी आली. हातात टाळ घेऊन. गळ्यात तुळशी माळ घालून. जसजशी जवळ आली मी तिला सांगू लागले. जवळ येऊ नको... दूर राहा...घरी जा. ती म्हणाली ' या तुळशी माळेत तुम्ही घातलेल्या आवरणा एवढी शक्ती आहे. ती माझी ऊर्जा आहे. या टाळाचा आवाज त्या आत श्वास घेणाऱ्या एक एक माणसापर्यंत जावा. त्याला ही जाग यावी म्हणून मी आले ग. तुझा बारा तासांचा आवरणातला कोंडमारा त्यात मी संजीवनी घेऊन आले आहे. त्याने मला धाडले आहे. तिथे  आकाशात खूप जणांचे आक्रोश सुरू आहेत. त्यांना शांत करण्यासाठी त्यांनी मला इथे या लाल दिव्याचा मागोवा घेत तुझ्यापर्यंत पोहचवले आहे. तुझ्या आवरणात माझी ही तुळशी माळ ठेवशील ना...बघ तुला बोलवेल आता ...

७. मी परिचारिका

Image
मी परिचारिका,        रडण्याचा आवाज थांबतच नव्हता म्हणून त्या नर्सने थोडे दार ढकलून पाहिले. एक नुकतंच जन्मलेल बाळ मुसमुसताना तिला दिसलं. मी पूर्णपणे मास्क आणि प्रोटेकशन कोट मध्ये होती. न राहवून मी  त्या बाळाला हाती घेतलं. झोपवण्याचा एक प्रयत्न करून पहावा म्हणून त्याला झुलवत असताना मला त्याच्या मनातलं काहीतरी ऐकू आलं. थोडं आणखी जवळ घेतलं तेव्हा ते मला काहीतरी सांगू लागलं.         आई ...आई ...ऐकतेस का ? आठवड्यापूर्वी मी या माणसाच्या जगात आलो होतो ना. अजून ही मी पाहुणाच आहे का ग. किती दिवस झाले मी अजून तुला पाहिलं ही नाही. माझे तर डोळे ही उघडले नसतील त्या आधीच तू नजरेआड झालीस. आता अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी तरी तू मला दिसायला हवी होतीस. मला तर सगळे तोंड झाकलेले. शरीर झाकलेले प्राणी दिसू लागले आहेत आजूबाजूला. त्यात मी तुला कसे बर ओळखू ! आणि मला बाबांनी घेतले ना तेव्हा ते ही मला नीटसे बघता आले नाही. त्यांनी माझा लांबूनच पापा घेतला. तुझ्या खोलीतून मला इथं आणताना वाटेत खूप गर्दी होती ग. त्या तोंड झाकलेल्या प्राण्यांची. ती माणसंच होती ना. ...

६. पत्रकार दादा / ताई

पत्रकार दादा / ताई ,        आपली दृष्टी अंधुक झाली किंवा नजर कमजोर झाली की पहिले डोळ्यांची तपासणी करून दृष्टी सुधारण्यासाठी चष्म्याची निवड करतो. त्याच चष्म्याने रोज सगळे जग पाहतो. आपली काम करतो. आपली नजर सुधारण्याचे काम मग हा चष्माच करतो. समजा त्या चष्म्याची निवड चुकली तर.        प्रत्येक ठिकाणी आपली ही नजर पोहचत नाही अशा वेळी चष्म्याचे काम करतात ते पत्रकार. समाजात चाललेल्या बऱ्या वाईट गोष्टी नजरेसमोर आणण्याचं काम हा चष्मा करतो नाही का ?        तुम्ही जे पाहता, जिथे राहता, जे शिकता आणि जसे घडता हे सगळंच जर या समाजावर अवलंबून असेल तर त्याच समजाला रंगवून सांगायचं काम करणाऱ्या पत्रकारांचे खरं तर केवढं कठीण काम. लहान मुलालाही त्याच गोष्टी सारख्या दाखवून त्याची मानसिकता बदलते. विचारांची दिशा बदलते, तेच काम पत्रकार करतात. रोजच्या कामात आपण इतके व्यस्त असतो, त्यातून किती आणि काय परिणाम होतो. आपली ऊर्जा नक्की कोणत्या दिशेला वाहते याचा विचार झाला का कधी ? खरं तर प्रकाशात आणण्यासारख्या बऱ्याच चांगल्या गोष्टी जगाच्या कोपऱ्यात कुठे ना कुठे...

५. पावसाचे पत्र

Image
हॅलो,         मी पाऊस बोलतोय. बऱ्याच दिवसात आपली भेट झाली नव्हती. म्हणून तीन - चार दिवस भेटीला आलो होतो. तुमच्या गावी. या वेळी मुक्काम थोडा लांबलाच नाही का...कदाचित म्हणून तुम्ही पृथ्वीवरची माझी लेकरं रागावली असाल माझ्यावर. साहजिकच आहे ते. आपल्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याचा ताप झाला की चिडचिड तर होणार त्यातून नुकसान केले तर कायमचा त्रासाचा वाटेनं कदाचित. या वेळी मात्र हा पाहुणचार थोडा महागात पडला त्याबद्दल माफी.        पण जर माझ्या अस्तित्वाचा विसर पडला,  माझ्या सुंदर सजवलेल्या सृष्टीला जर किंमत मिळाली नाही, तिला ओरबडणारे हात जर वाढू लागले तर मात्र मी कसा शांत बसणार ? आई बाप आणि गुरू ज्याप्रमाणे आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेला आणतात. काय चूक काय बरोबर ते  दाखवतात,  तसाच मी ही आलो गर्जत बरसत. आपले अस्तिव दाखवायला. आपली शक्ती दाखवायला. लोकांचे खोटे मुखवटे उतरवायला. झापडावरची धूळ स्वच्छ करायला. त्यांची हुशारी पाहायला. त्यांच्यात विझत चाललेल्या कृतन्यतेला पुन्हा पेटवायला.        मी आलेलो ज...

४. प्रिय दादा

प्रिय दादा,       विसरलास का रे बहिणीला... आज रक्षाबंधन आहे. कामाच्या व्यापात तुला माझ्याशी बोलायचा वेळ मिळतच नाही. पूर्वी सारखं एकाच गोष्टीवरून तासनतास आपल्या गप्पा रंगत नाही. वाद सोडाच तू हल्ली मला खुशाली पण विचारत नाही. विसरलास का रे बहिणीला. तुझ्या पहिल्या आणि जवळच्या मैत्रिणीला ?      आज रक्षाबंधन आहे.  तुझ्या बिझी वेळापत्रकातून वेळ मिळेल तसं माझ्याशी बोलता येईल, वाचता येईल,  म्हणून आज हे पत्रच लिहिलं शेवटी. राखी आहे पत्रासोबत आणि तुझी जबाबदारी सुद्धा...राखी बांधशील ना जेव्हा मनगटावर तेव्हा आपोआप ती जबाबदारी ही मिळेल तुला. फक्त तुझ्या बहिणीच रक्षण करण्यासाठीच नाही बरं का...या बहिणीसारख्या इतर ही बहिणी आहेत याची जाणीव ठेवण्यासाठी, त्याच्या नजरेला नजर देताना, त्यांना मदत करताना, त्यांची मदत घेताना, समाजाच्या बदलत्या रंगात रंगून जाताना येते ती जबाबदारी. आज ही राखी अशीच नाही बांधायची, ओवाळणी हवीच आहे मला...लहानपणी सारखा हट्ट समज...नाहीतर बंधूप्रेम...आपल्याला गिरवायला शिकवणाऱ्या, संस्काराचे बाळकडू देणाऱ्या, युद्ध जिंकणाऱ्या कोणाच्या तरी बहिणी...

१०. मला आलेले बाप्पाचे पत्र

Image
प्रिय भक्तजन...   ओळखलं का मला, तयारी करताय ना माझ्या येण्याची, दरवर्षीप्रमाणे माझा उत्सव साजरा करण्यासाठी दारे उघडी ठेऊन वाट पाहताय ना तोच मी तुमचा लाडका बाप्पा लवकरच येतोय. सध्या वाटेतच आहे. कल्पना देण्यासाठी म्हणून हे पत्र पोहोचवतो तुमच्यापर्यंत... वर्षामागून वर्ष गेली पण माझ्या भक्तांचा उत्साह काही कमी नाही झाला. हे पाहून खरंच खूप आनंद झाला मला, त्यामूळे यायची ओढ अजून वाढली आहे आता. येता येता वाटेत मला स्वयंपाक घरात सुगरण सासू- सुनेच्या हातच्या गोरापान मोदकाची शिदोरी मिळाली. चांगले दहा दिवस आरामात पुरतील इतकं प्रेम ओतल्यावर चव तर छान होणारच. घरादारात माझ्या आगमनासाठी कधीही सोबत न दिसणारी चार माणसं एका छताखाली जमली आहेत. मनांना नात्यात गुंतवण्याची ही सुवर्ण संधी मी कशी बरं सोडणार! चिमुकले हातांनी साकारणारे माझे मातीतले गोजिरे रूप पाहण्याची उत्सुकता आता मला काही स्वस्थ बसू देईना. त्याच्या कौतुक सोहळ्याचा शुभारंभ करण्यासाठी मी येतच आहे. मंडपात स्पर्धा, असूया सोडून एक आवाजात आणि एक सुरात माझी आरती म्हणणारे सगळे भक्तगण ऊन पावसात मी दहा दिवस त्यांच्या जवळ राहण्यासाठी राबत...

३. आदरणीय शिक्षक

आदरणीय शिक्षक...        एक दोन दिवसांपूर्वी शिक्षक दिन होऊन गेला. जयंती, पुण्यतिथीप्रमाणे तो छान ऑनलाइन साजरा ही झाला. आपल्या हातातल्या पेन आणि पेन्सिलचा उपयोग करून कोऱ्या पानावर श्री गणेशा करायला शिवणारे कोण...शिक्षकच. तुमचा तो दिवस. काल हे पत्र लिहावेसे वाटले. शुभेच्छा म्हणून नाही. एक आठवण म्हणून. हातावरच्या रेषा नाही तर हाताला आणि बुद्धीला वळण लावणारे भाग्य रेषा म्हणून लाभलेलं वरदान म्हणजे शिक्षक. उडणारी, पळणारी अक्षरे एका ओळीत बसवली, त्यांच्यावर प्रेम करायला शिकवले, त्याचा आदर करायला शिकवला, त्याचे अर्थ आणि सामर्थ्य पटवून दिले असा माणसाच्या रूपातील देवमाणूस म्हणजे शिक्षक.       आज जेव्हा बदलत्या समाजात एक शिक्षक म्हणून उभं राहते तेव्हा मुलांची ज्ञानाची भूक दिसते. कधी गुणवत्तेमागे धावणारी ओळ दिसते. कधी कष्ट करून पुस्तकांची झालेली झीज दिसते तर कधी सोप्या मार्गाने ओरबाडून घेतलेले यश दिसते. झिजवतो तो भक्षक, सांभाळतो तो रक्षक आणि शिकवतो तो शिक्षक. नुसत्या अभ्यासाने वाढते ते बाभूळ अन शिक्षणाने वाढतो तो वटवृक्ष, ज्याच्या पारंब्या चार ही दिशांना पसरत ...

२. प्रिय शाळा

Image
प्रिय शाळा…       लहानपणी माझी शाळा विषयावर चार - पाच ओळी लिहायला ही किती डोकं खाजवायला लागायचं. सुरुवात करायलाच पहिली पाच मिनिटे जायची. आज शाळेसाठी लिहिताना कुठून नक्की लिहायला सुरवात करू अशी परिस्थिती झाली. आज सात - आठ वर्षांनी शाळेविषयी लिहायला गेले तर वहीची पानंही कमी पडतील पण शाळेसोबत जोडलेल्या त्या जिवंत आठवणी काही संपणार नाही. भांडून तोंडून मिळवलेली आपली बेंचवरची जागा काय आणि शेवटून सुरू होणारी ती गृहपाठाची तपासणी आज त्याच जागेवर बसून झपकन डोळ्यासमोरून जाते. आज माननीय मुख्यध्यापकांच्या बोलण्यात आलेले एक वाक्य " शाळा आठवणीत राहते, दिसते आणि मोठी होते ती तिथल्या सोयी सुविधामुळे नाही, तर विद्यार्थ्याच्या वागण्या - बोलण्यातून " आणि याची जाणीव त्या बाल वयात नाही तर त्या चार भिंतीच्या बाहेरच्या जगात पाऊल ठेवल्यावर होते. माझी मराठी शाळा मला हे नेहमीच शिकवते, तुम्ही कितीही मोठे व्हा, जेव्हा ते उंच शिखर गाठाल, पुन्हा शाळेची पायरी चढताना आपोआपच आपली मान तिच्यासमोर झुकते आणि या ज्ञानगंगेत नाहून निघाल्यावर घडणारे मौल्यवान हिरे कधीच जगाच्या बाजारात कवडीमोल होत नाही....