Posts

Showing posts from October, 2024

३६. फांदी

Image
घराच्या मागे आलेल्या आंब्याच्या झाडाशी तेव्हा माझा कायम जिव्हाळ्याचा संबध असायचा. खेळण्या बागडण्यासाठी त्याच्या फांद्या पुरेशा असायच्या. आकाशाला गवसणी घालणाऱ्या त्याच्या फांद्या पकडण्यासाठी कायम चढाओढ असायची. त्या झाडाच्या अगदी जवळ वडाच्या झाडाने आपलं बस्तान मांडले होते. आंबाच्या झाडासोबत पाठच्या भावासारखे ते ही डेरेदार वाढत होते.  एक दिवस खेळता खेळता आंब्याच्या झाडाची एक फांदी तुटली. त्या फांदीला आलेले पिटुकले आंबे ही जमिनीवर  पडले आणि त्यावरचे घरटे ही तसेच जमिनीवर आले. तेव्हा ती तुटलेली फांदी पाहून वाटले तात्काळ त्या घरट्याचे आणि आंब्याचे विश्व संपुन गेले. माझ्या हातातली तुटलेली फांदी आजीने घेतली, त्याला आलेले आंबे काढून धुवून गवतात ठेवले. आंबे लहान होते तरी काही दिवसांनी त्यांच्यात आपोआप गोडवा आला. खाली आलेले घरटे उचलून आजीने कुंपणावर ठेवले. त्यात वाटीभर पाणी ठेवल्यावर आपोआप त्यात चिवचिवाट सुरू झाला.  क्षणभर थांबलेले विश्व पुन्हा पूर्ववत झाले. फांदीचे तुटून वेगळे होणे जरी अनिश्चित होते तरी तिथे नवीन फांदी येणे हे निश्चित होते.  काही दिवसांनी कुंपणावर आलेल्या चिमण्...