Posts

Showing posts from November, 2021

१७. चार दिवे

Image
      एक दिवा हातात आणि एक लांब दिव्यांची रांग शेजारी. हातातला दिवा सगळ्यांच्या सोबत रांगेत ठेवतेच म्हणे पर्यंत विझला. पुन्हा ती वात पेटवण्यासाठी मी काडेपेटी आणायला आत गेले. तो दिवा तसाच शेजारी ठेवलेला. येऊन पाहते तर दिव्याची ज्योत पेटलेली. जादूच झाली म्हणत आत गेली तर तो दिवा लावला होता आईने. शेजारच्या रांगेतल्या पणतीनेच. परत बाहेर आले तर त्या पणतीची ज्योत कमी करते; तसा त्यातुन चराचर आवाज झाला. जवळ गेले तर ती म्हणते. " इतक्या लांब का गेलीस " शेजारचा दिवा " ; तो ही माझ्यासाठी पुरेसा होता. "     काही तरी ऐकायचे अजून राहिलेले म्हणून थांबले तर वेगळीच चर्चा तिथे चार दिव्यांची रंगली होती. कदाचित तुम्हाला ही ऐकायला आवडेल...     " आज खूप दिवसांनी प्रकाशात आला तो कट्टा. तो उंबरठा. तो आणखी एक कोपरा. मागच्या वर्षी तिथे एक कंदील पण होते. यावेळी आपण चार दिव्यांनी त्याची जागा घेतली बहुतेक. जरा उंबऱ्यातुन वाकून पाहावे तर किती दिवसांनी शेजारची, त्याच्या शेजारची सगळीच गल्ली प्रकाशात आली होती. या वेळी थोडीशी कमी रोषणाई होती. पण एका घरातला एक दिवा असे करत सगळ...