३१. माय मराठी

" मी मराठी बोलतेय "
"आज मी तुम्हा सर्वांशी बोलण्यासाठी आले..."
" मनामनात निपजणारी, सहज ओठांवर रुळणारी...
माय मराठी... "
"खर सांगू का ! कॉलनीच्या कट्ट्यापासून ते गावाच्या शिवारा पर्यन्त माझ्या जवळ असणारी तुम्ही सारी माणसे मी पहिली ना तेव्हा ही माय खुश झाली. "
“आज जेव्हा मी बघते की, मोबाईलच्या कि पॅड पासून ते अगदी पौराणिक ग्रंथापर्यन्त माझा वापर केला जातो तेव्हा बरं वाटतं.” 
“मी अनेक पिढ्या पाहिल्या व त्या पिढ्यानी माझा कसा वापर, आदर, जपणूक केली ते पाहात आले.”
" सार्वजनिक ठिकाणापासून ते घराच्या चार भिंतीमध्ये माझं असणं मला जाणवलं ना...तेव्हा माझा उर  भरून आला. " 
" औद्योगिक क्षेत्रापासून ते साहित्यिक प्रवाहात मी स्वतः ला पाहिले, तेव्हा मला माझी व्याप्ती जाणवली. "
" आज मी शाळेतल्या एका वर्गात गेले, तिकडे बोबड्या शब्दात " ये रे पावसा... " सुरू होते. "
" कुठे नव्वदीची आजी तेलवाती करता करता " रुणू झुणू रे भ्रमरा " अभंग म्हणत होती." 
“आज काही तरुणांना पाहिले, ते त्यांच्या मोबाईलवर मराठी टाईप करू पाहत होते, अवघड जात होते पण त्यांचा केविलवाणा प्रयत्न पाहून जाणवले की माझी गोडी अजूनही सगळ्यांना आहे . ”
" माझ्या वाटेत आज काही प्रेमगीते, भक्तिगीते, भावगीते आणि प्रेरणागीते आली. "
" माझ्या वाटेत बरीच पुस्तके आली. "
" माझ्या वाटेत नात्यातले घरपण आले आणि माणसामाणसातले रितेपण गेले. "
" माझ्या कुशीत सारे एकत्र आले आणि ते चित्र पाहून मी आनंदून गेले. " 
" मी तुमची माय मराठी...आज आनंदून गेले. "

- जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा