४०. सुरकुत्या
काल रात्री झोपण्याच्या आधी आईने जवळ बोलवून डोक्याला ते करता करता तिचा हात माझ्या खांद्यावर आला. आधार तिचा मला की माझा तिला हा संभ्रम होता. तेव्हा तिचा हात हातात घेतला आणि म्हणलं " सुरकुत्या दिसू लागल्यात ग आई हातावर.... " त्यावर ती म्हणाली " अग या सुरकुत्या म्हणजे माझ्या आयुष्यात आलेली वेगवेगळी माणसे आहेत. अनुभवाच्या प्रवासात ती माणसे क्षणिक ही असतील कदाचित पण या सुरकुत्या त्याची निशाणी आहे. त्या जपायच्या आणि कायम सोबत ठेवायच्या.
- ©®जुई
Comments
Post a Comment