३९.नवदुर्गा

नवदुर्गा आपण शक्ती स्थान म्हणून मानतोच, पण आपल्या आजूबाजूला ही अशी शक्ति स्थान आहेत. आपण कधी शोधण्यासाठी निघालो तर नक्कीच या नव दुर्गा आपल्याला प्रवासात भेटतील. हा शोध आहे आपल्यातल्याच नवदुर्गाचा. ज्यांना गरज आहे नव्या जोमाने पुढे येण्याची. गरज आहे, स्वतःला नव्याने जाणून घेण्याची. गरज स्वतःला सिद्ध करण्याची, एक संधी देण्याची. चला तर हा प्रवास करूया, एक प्रवास तिच्यासाठी. तिच्यातल्या लक्ष्मीला शोधण्यासाठी. तिच्यातल्या सरस्वतीला शोधण्यासाठी. तिच्यातल्या रणरागिणीला शोधण्यासाठी. आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या या शक्तिला वंदन करण्यासाठी ... एक प्रवास तिला शोधण्यासाठी ... 

 - ©®जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा