४२. देणे


देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे

ही विं. दा करंदीकर यांची सुप्रसिद्ध कविता ज्या विषयावर भाष्य करते ते आपल्या जगण्यातले मर्म, देणारे दोन हात... दातृत्व

देण्याची ही भावना निसर्गतः खर तर प्राणी मात्रामध्ये रुजलेली आहे. आपण या सृष्टीचा एक भाग म्हणून वावरताना खर तर प्रत्येक श्वासा साठी या निसर्गाचे देणे लागतो. ही एक आणि अशा असंख्य गोष्टी नकळत पणे आपल्या रोजच्या जगण्यात सहज येतात ज्याची जाणीव ही आपल्याला नसते. ही निसर्गाने रुजवलेली भावना असून ही आपल्या मनात लोभ आणि हव्यास कसा निर्माण करून जाते ?  म्हणजे सतत मिळणाऱ्या या गोष्टीला पूर्ण विराम लागतो तेव्हा च का त्याची जाणीव व्हावी?  कोरोना महामारी चे चित्र पाहता सगळ्यात मोठी झळ ही मनुष्याला झाली ज्यात त्याला या हवेतल्या " प्राण " वायूची किंमत मोजावी लागली. देणारा निसर्ग अचानक आपले श्वास घेणारा झाला.

अतिसंचयाने जशी गरीबाच्या फाटक्या झोळीमुळे माती होते तशी गती आपली तर होत नाही ना ?  तेव्हा आपल्याला जशी एखाद्या गोष्टीची गरज भासू शकते तशीच ती इतर कोणाला तरी असू शकते. अशा गरज वंताला देणारे हात आपल्याकडे खरंच असतात का ? 

कधी कधी नकळत आपल्याकडून विद्यादान, अन्नदान होते ही, कधी ते औपचारिकता म्हणून दान धर्म म्हणून केले जाते. कधी कधी आपण कोणाचे तरी देणे करी असतो म्हणून दिले जाते. निसर्गाने रुजवलेले सहज देणे आपल्यात बहारायला कधी लागणार असा जेव्हा प्रश्न मी स्वतः ला विचारला तेव्हा त्याला मिळालेले उत्तर असे होते 

देणे ही एक वृत्ती किंवा एखाद्याचा स्वभाव असतो तसे च देणारे हात असतात. या उलट घेणे हा देखील स्वभाव असू शकतो. फरक शेवटच्या ओळीत येतो ज्यात देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणले म्हणजे घेणाऱ्याने देणाऱ्याचा देण्याचा स्वभाव घ्यावा. 

आजच्या काळात आपण खरंच देणारे असू तर घेणारे हात आपल्या आजूबाजूला आपोआप वाढत जातात. कधी कधी तेच हात आपल्यालाच दुखावतात. गृहीत धरले जातात. तेव्हा आपण अशा व्यक्तीच्या शोधात असायला हवे जी आपल्याकडे असलेल्या औदार्य समजून त्याला महत्व देईल. त्याच भावनेने ती व्यक्ती ही देणारी असेल. नाईलाजाने नव्हे तर स्वाभाविक पणे तसे करणारी असेल.
त्यामुळे तुम्ही ती व्यक्ती शोधा, त्या व्यक्तीला प्रेम द्या, कारण कधी कधी तुम्हाला स्वतःला ही देता देता घेण्याची गरज पडणार आहे. 
{ If you are giver, find @nother giver } 

- जुईली विद्याधर नाईक

Comments

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा