माझे आवडते शिक्षक


लहानपणी मी पहिल्यांदाच सायकल शिकत असताना जेव्हा पडले. तेव्हा रस्त्यातले खड्डे आणि चुकीची दिशा एवढेच कारण होते. पण तेव्हा सायकल चालवताना कुठे पडण्याची शक्यता आहे? कुठे काळजी घ्यायची? हे समजले. माझ्यासाठी शिक्षक म्हणजे काय? हे समजायला तिथूनच  सुरुवात झाली. 

मी "आवडता" या विषयावर लिहायला घेतले आणि नावडता विषय आपसूक आलाच. ज्या ज्या गोष्टी पूर्वी नावडत्या वाटत होत्या. ज्या विषयांची भीती असायची, त्याला सोपे करून देणारा व्यक्ती तो आवडता शिक्षक हे सहज समीकरण झाले. बीजगणित, भूमिती, इतिहासातील इसविसने, भूगोलातील नकाशे, अर्थ शास्त्र, रसायन शास्त्र त्यानंतर हळूहळू समजत गेलेले समाज शास्त्र. मला या आणि अशा वेगवेगळ्या पेचातून बाहेर काढण्यासाठी त्या त्या वेळी भेटणारी माणसे कालांतराने आवडती होत गेली. मी ही कोणासाठी आवडती शिक्षिका होऊ शकते ही प्रेरणा जिथून घेतली. माझ्या कोऱ्या पाटीवर ज्यांनी सर्वोतम गिरवायला शिकवले. ती प्रत्येक व्यक्ती आवडती झाली.
शिकण्याच्या या प्रवासात सारी भेटत गेली. त्यामुळे हा प्रवास आणखी सुंदर झाला, आठवणींनी समृद्ध झाला. 


- जुई

Comments

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा