१०. मला आलेले बाप्पाचे पत्र
प्रिय भक्तजन...
ओळखलं का मला, तयारी करताय ना माझ्या येण्याची, दरवर्षीप्रमाणे माझा उत्सव साजरा करण्यासाठी दारे उघडी ठेऊन वाट पाहताय ना तोच मी तुमचा लाडका बाप्पा लवकरच येतोय. सध्या वाटेतच आहे. कल्पना देण्यासाठी म्हणून हे पत्र पोहोचवतो तुमच्यापर्यंत... वर्षामागून वर्ष गेली पण माझ्या भक्तांचा उत्साह काही कमी नाही झाला. हे पाहून खरंच खूप आनंद झाला मला, त्यामूळे यायची ओढ अजून वाढली आहे आता. येता येता वाटेत मला स्वयंपाक घरात सुगरण सासू- सुनेच्या हातच्या गोरापान मोदकाची शिदोरी मिळाली. चांगले दहा दिवस आरामात पुरतील इतकं प्रेम ओतल्यावर चव तर छान होणारच. घरादारात माझ्या आगमनासाठी कधीही सोबत न दिसणारी चार माणसं एका छताखाली जमली आहेत. मनांना नात्यात गुंतवण्याची ही सुवर्ण संधी मी कशी बरं सोडणार! चिमुकले हातांनी साकारणारे माझे मातीतले गोजिरे रूप पाहण्याची उत्सुकता आता मला काही स्वस्थ बसू देईना. त्याच्या कौतुक सोहळ्याचा शुभारंभ करण्यासाठी मी येतच आहे. मंडपात स्पर्धा, असूया सोडून एक आवाजात आणि एक सुरात माझी आरती म्हणणारे सगळे भक्तगण ऊन पावसात मी दहा दिवस त्यांच्या जवळ राहण्यासाठी राबत आहेत. त्याच दिमाखदार दरबारात सामाजिक आणि वैचारीक प्रबोधन करतात, त्यांना बक्षीस द्यायला मी येत आहे. जिथे माझ्या नावाने द्वेष आणि भपकेबाजपणा चालला आहे, जिथे प्रसादाच्या रुपात लोकांची आणि त्याच्या भावनांची लूट होते, जिथे माणुसकी धर्म सोडून धार्मिक तेढ निर्माण केले जातात, माझ्या सुपासारख्या कानांनी जसे मी तुमची गाऱ्हाणी ऐकतो, इच्छा ऐकतो, प्रार्थना ऐकतो तसे कलहाचे सूर आणि कर्कश आवाजातला शुद्ध हरपून केलेला धिंगाणा ही ऐकतो आणि पाहतो, त्रास झाला तरीही तिथेही मी येणार आहे आणि त्याच्या कानात सांगून जाणार आहे. "असे करू नका, निनाद होऊ द्या तुमच्या यशाचा, व्यसन लागू द्या ज्ञानाचे, श्रद्धा आसुद्या कर्मावर आणि दृष्टी असुद्या सत्यावर. मग नशीब बदलायला वेळ लागत नाही हे ही सांगणार आहे. " मग तयारीला लागा मी येतोच... पाहायला...लवकरच.
तुमचा लाडका बाप्पा...
- जुईली अतितकर
👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिले आहेस जुई! तुझ्या ह्या पत्रातून नक्कीच सर्वांपर्यंत बाप्पाचे म्हणणे पोहोचेल ह्यात शंकाच नाही...
ReplyDeleteखूप छान! अशीच लिहीत रहा 👍👍👍👌👌👌
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
मंगलमूर्ती मोरया 🙏🏻💐🌻
🌸गणपती बाप्पा मोरया 🌸
Delete