७. मी परिचारिका


मी परिचारिका,
       रडण्याचा आवाज थांबतच नव्हता म्हणून त्या नर्सने थोडे दार ढकलून पाहिले. एक नुकतंच जन्मलेल बाळ मुसमुसताना तिला दिसलं. मी पूर्णपणे मास्क आणि प्रोटेकशन कोट मध्ये होती. न राहवून मी  त्या बाळाला हाती घेतलं. झोपवण्याचा एक प्रयत्न करून पहावा म्हणून त्याला झुलवत असताना मला त्याच्या मनातलं काहीतरी ऐकू आलं. थोडं आणखी जवळ घेतलं तेव्हा ते मला काहीतरी सांगू लागलं.
        आई ...आई ...ऐकतेस का ? आठवड्यापूर्वी मी या माणसाच्या जगात आलो होतो ना. अजून ही मी पाहुणाच आहे का ग. किती दिवस झाले मी अजून तुला पाहिलं ही नाही. माझे तर डोळे ही उघडले नसतील त्या आधीच तू नजरेआड झालीस. आता अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी तरी तू मला दिसायला हवी होतीस. मला तर सगळे तोंड झाकलेले. शरीर झाकलेले प्राणी दिसू लागले आहेत आजूबाजूला. त्यात मी तुला कसे बर ओळखू ! आणि मला बाबांनी घेतले ना तेव्हा ते ही मला नीटसे बघता आले नाही. त्यांनी माझा लांबूनच पापा घेतला. तुझ्या खोलीतून मला इथं आणताना वाटेत खूप गर्दी होती ग. त्या तोंड झाकलेल्या प्राण्यांची. ती माणसंच होती ना. या बाहेरच्या जगात किती गोंधळ आहे ग. किती कोड्यात टाकणारी ही जागा आहे. मी कधी पासून इथे रडत होतो. कोणीच कसे आले नाही माझं रडणं ऐकून. तू तरी आलीस ना बघ. मला भूक लागली ग कधी पासून.
माझी अजून जीभ ही नीटशी हलत नाही. तूला मी हे कसं सांगणार. म्हणून हा रडण्याचा बहाणा केला. खर सांगू मला इथल्या पेक्षा तुझ्यातच जास्त सुरक्षित वाटत होतं. आता तरी मला तुझ्या जवळ घेशील का ? 
    बारा दिवस सतत काम करणाऱ्या माझ्या झाकलेल्या चेहऱ्यावरून त्या बाळाला पाहून मायाचे झरे वाहू लागले होते. एक क्षण वाटले सगळे विसरून आईच्या पदरात घालावे याला. पण स्वतःच्या चेहऱ्यावर लावलेल्या या संरक्षक भिंतीला मी फोडून जाऊ शकली नाही. बाळाचे रडणे थांबले अन ते कधी माझ्या कुशीतच झोपले ते कळले ही नाही. मी त्या रिकाम्या पाळण्याकडे आणि माझ्या कुशीत झोपलेल्या बोलक्या निजलेल्या डोळ्यांकडे पाहतच राहिले.

- जुईली अतितकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा