८. एक डॉक्टरांचे पत्र


    आज खूप दिवसांनी रुग्णांच्या सेवेनंतर दोन तीन मिनिट बाहेरच्या कॉरिडॉर मध्ये फिरताना माझी नजर वर आकाशाकडे गेली त्यानंतर समोरच असलेल्या लाल दिव्याच्या खोलीकडे. 
         अचानक इथे ही महापूर आला माणसांचा. एक दोन वरून शे दोनशे वर माणसं  आली इथे. बरीचशी प्रयत्नानी  बरी होऊन घरी गेली. काहीनी त्या आकाशातला एक तारा होऊन इथेच अलविदा केले. तिथेच मी फिरताना एक मुलगी आली. हातात टाळ घेऊन. गळ्यात तुळशी माळ घालून. जसजशी जवळ आली मी तिला सांगू लागले. जवळ येऊ नको... दूर राहा...घरी जा. ती म्हणाली ' या तुळशी माळेत तुम्ही घातलेल्या आवरणा एवढी शक्ती आहे. ती माझी ऊर्जा आहे. या टाळाचा आवाज त्या आत श्वास घेणाऱ्या एक एक माणसापर्यंत जावा. त्याला ही जाग यावी म्हणून मी आले ग. तुझा बारा तासांचा आवरणातला कोंडमारा त्यात मी संजीवनी घेऊन आले आहे. त्याने मला धाडले आहे. तिथे  आकाशात खूप जणांचे आक्रोश सुरू आहेत. त्यांना शांत करण्यासाठी त्यांनी मला इथे या लाल दिव्याचा मागोवा घेत तुझ्यापर्यंत पोहचवले आहे. तुझ्या आवरणात माझी ही तुळशी माळ ठेवशील ना...बघ तुला बोलवेल आता आत कोणीतरी. मी म्हणले तुझं नाव तरी सांग पोरी. ती माझ्यापासून पळतच दूर गेली. " मी रखुमाई." ती माळ तिथेच टाकून. तेवढयात आतून आवाज आलाच. मी लगेच आत गेले. आणखी एकाचा बळी गेला होता. मी लगेच बाहेर आले. ती माळ पाहिली. ती तिथे नव्हतीच. निराशेने मी पुन्हा आकाशाकडे पाहिले. खरंच खूप आक्रोश होत असणार जो तिथपर्यंत ऐकू जातो. मी लाल दिव्याच्या खोलीत परत आले. 
         त्या नुकत्याच निधन झालेल्या माणसाच्या  शेजारी पलंगा खाली पडलेली तीच तुळशी माळ. वोर्डबॉयला विचारले ही माळ कोणाची ? तो म्हणला त्यांच्या पोरीने दिली होती म्हणे माळ. मागच्या आठवड्यात आली होती केस तिची " ती रखुमाई. " 

- जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

३१. माय मराठी

२५. मोत्यांची माळ

२६. जत्रा