१४. आईला पत्र
तीर्थरूप आई,
आज खूप दिवसानी तुला पत्र लिहिते. लहानपणी शाळेत " माझी आई " वर लिहिलेल्या दहा ओळीवर उरकाव इतके सैल हे नातं नाही. त्याची पकड चोवीस, पंचवीसच्या वयात असलेल्या मुलीला बऱ्याच अंशी कळते.
कितीही ठरवलं तरी मी सगळ्यांच गोष्टी सांगणं कधी कधी खरंच क्षमतेपेक्षा जास्त मोठा दगड उचलल्यासारखं वाटतं. कधीतरी चिडचिड, कधी होणारी धांदल, कधी कारण नसताना केलेल्या छोट्या छोट्या लढाया. एवढं करून ही त्यावर मायेची फुंकर घालून विजयी तूच होते.
कधी कधी प्रश्न ही पडतो. न सांगता सगळंच कस तू मनातलं ओळखते. कधी ओळखून ही काहीच माहीत नसल्याचे भासवतेस. हट्ट केला नसेन कधी पण एकदा कशाची इच्छा बोलून दाखवली की ती पूर्ण करण्यासाठी खटपट करतेस. मी तुझ्या मायेच्या कक्षेतून थोडी दूर गेली की तुझी ही चलबिचल होते. मागे पडत होते तेव्हा तू ही माझ्यासाठी मागे आलीस. पुढे जाण्याचा आग्रह केला नाहीस. पण त्यात ही प्रेम होते.
एवढं सगळं कसं जमवतेस ? विचारल्यावर वेळ आली की जमते सगळं. अस ही म्हणते. ती वेळ आज आली आहे. जमवलं पाहिजे ही इच्छा आणि शक्ती दोन्ही तुझ्यामुळेच. जग किती ही मोठं असलं तरी त्यात तुझ्या मुलीचं छोटंसं नाव असेल ते ही तुझ्या पंखाखाली लिहिलेल्या आणि शिकलेल्या चार ओळीमुळे.
सगळेच शिकवतात. अशी खूपदा तक्रार केली असेन मी. पण चांगले ते ऐकायची समज तूच दिलीस ना. शब्दाच्या बळावर किती ही जग जिंकले तरी त्याची सुरवात, त्याचा अर्थ आणि त्यातल्या भावना माझ्याच नसतात ना. काही शब्द मी तुझ्याशी बोलताना शिकले. काही तुला शिकताना, समजून घेताना.
" मोठी होशील तेव्हा जमेल तुलाही " म्हणणारी माझी आई, मी मोठी झाली तरी माझ्या लहानपणात रमते. तिच्या ही मनात माझ्या भविष्याची चिंता असते. माझ्या पाखरांचा हा पिंजरा कधी तरी उघडून ते ही जातील. याची हुरहूर तिला ही असते. तरी ती आनंदी असते. " कसे होणार ग पुढे ..." काळजीने भरलेल्या या वाक्यातून ही तिचे प्रेम दिसते आणि आयुष्यात त्यामुळेच पुढचे शिखर गाठण्याचे धाडस मी करते. क्षमतेपेक्षा मोठ्या सीमा ओलांडते. पण " आई " या नात्यावर आजही मन तिथेच तिच्या जवळ रेंगाळते.
तुझी मुलगी
जुई

अगदी मनस्वी लिहील पत्र ....
ReplyDeleteThanks nitin dada
Delete🥺❤️❤️❤️❤️
ReplyDelete✌️😊
Deleteखूप सुंदर लिहिले आहे♥️🌸
ReplyDeleteThanks omkar
Deleteफार सुंदर लिहीलंय जुई
ReplyDeleteThanks प्रणिता ताई❣️
Deleteमनाचं दार कीलकीलं करणारे पत्र आहे... छान जुईली.
ReplyDeleteThank you 😊
Deleteअगं किती सुरेख लिहिलंस, मोजक्या शब्दात किती मोठा मजकूर❤️❤️
ReplyDeleteहो... मनातले शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न. Thanks ताई
Deleteखूप सुंदर लिहिलं आहेस, जुईली👌👌
ReplyDeleteThanks अनघा😊❣️
Deleteछान लिहले आहेस
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआई सोबत राहाणे किती सुखदायक असते ना..खरंच आई नेहमी आपल्या सोबत असावा..मला माझ्या आईची आठवण आली..गाव सोडल्यापासून मी पारखा झाल्यासारखे वाटते.
ReplyDeleteधन्यवाद कवी भावेश. आई हे न संपणारा जिव्हाळ्याचा झरा.
Delete