१९. प्रिय पुस्तक
प्रिय पुस्तक ...
शाळा आणि गणवेश सोबत होता तेव्हा सतत तुझी सोबत असायची. तेव्हा पाठीवरचे ओझे, परीक्षेचे वेळापत्रक आणि गृहपाठ इतकं काय ते आपलं औपचारिकतेच नातं होतं. तुझ्यात डोकावताना एक तर तोंड उघडायचे ते पाठांतर करण्यासाठी किंवा जांभई देण्यासाठी. ते विश्व निराळं होतं. जवळ असून ही आपल्यात थोडा दुरावा होता. शब्द होते पण त्याची रत्ने वाटली नाहीत. पान होती वेगळी पण वेगळेपण कळलं नाही. पुस्तकांचे रकाने होते पण पुस्तक फारशी गर्दी करून राहिली नाहीत.
आता का तसे होत नाही. तुझ्यात डोकावताना आता जांभई कधी तरीच येते. पाठांतराची गरज लागत नाही. वेळापत्रक नसलेल्या परीक्षेसाठी तुला वाचते रोज... पाठीवरचे ओझे तेव्हा वाटले पण ते कधी मनावर आले कळलं नाही आणि त्याच मनावरचं आपलंच एक अपेक्षांचं गाठोडं थोडा वेळ का होईना बाजूला ठेवून तुला वाचते. नंतर ते गाठोडं ही हलकं वाटायला लागतं. तेव्हा आपलं औपचारिकतेच नातं असं अचानक कसं बदललं. याचा विचार अजून ही मी करते.
शब्द म्हणजे जमिनीवर पडलेली लहान मोठे दगड असतात. कोणी तुडवुन पुढे जातो. कोणी बाजूला करतो तर कोणी त्याला चुकवून पुढे जातो.
काही " पुस्तक मित्र " असतात, जे ती दगड गोळा करतात. त्याच्या भक्कम चार भिंती उभ्या करतात. कोणता दगड कुठे बसेल हे त्यांना हळुहळु समजायला लागतं. तुला वाचता वाचता ते या भिंतीवर आपलं एक नाव मागे ठेवतात आणि पुढे येणारा या भिंती वाचत जातो. पुढे आणखी वाचत जातो. काही वाचलेल्या भिंतीचे महाल बांधतात. काही फक्त भिंतीच बनून राहतात.
मित्रा ... तुझं माझ्यातलं हे औपचारिकतेचं नातं कसे अचानक बदलले याच उत्तर हेच असेल कदाचित. तेव्हा मी भिंती वाचत होते. पुढे या भिंतीचं घर झालं असावं. आज तशीच दगड मला दिसतात तेव्हा मी माझी भिंत बांधते. कोणीतरी येऊन ती भिंत ही वाचेल... वाचुन पुढे जाईल.
इतकंच
- जुईली अतितकर
तुझे अप्रतिम पुस्तक नक्कीच दस्तक देते आमच्या भूतकाळाच्या आठवणीला...छान
ReplyDeleteवाह.... नक्कीच निखिल
Deleteमनःपूर्वक धन्यवाद ✍️
सुंदर
ReplyDeleteThanks
Deleteखूप सुंदर लिखाण जुई. तुझी भिंतीवर नेहमीच काहीतरी छान सुंदर वाचायला मिळते तुझी वॉल अशीच भरलेली असो हीच शुभेच्छा
ReplyDeleteThank you 🙂
Delete💕
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDeleteजुई तुझ्या लेखणीतून बाहेर पडलेले आणखी एक गोंडस शब्द पुष्प. लवकरच तू ह्या शब्द पुष्पांनी सजवलेल्या भिंतींचा महाल होईल तेव्हा चित्र काय देखणे असेल!
ReplyDelete- mad
Thank you amol
ReplyDelete