२०. सोबत
प्रिय मित्र मैत्रिणींनो...
माझ्या सर्व अशा मित्र मैत्रिणींसाठी मी आज काही लिहिणार आहे ज्यांनी काही ना काही कारणामुळे आपल्या आयुष्यातली अगदी जवळची व्यक्ती गमावली आहे. आज लिहिताना अशा असंख्य लोकांना मी पाहते, वाचते जे एकट्याने आयुष्य घालवत आहे. ज्यांना त्यांच्या भूतकाळातील " सोबत " जीवघेणी वाटते. तर कधी तरी तशी " सोबत " मिळण्याची अपेक्षा सतत डोकावत राहते. असे जीवन म्हणजे कदाचित " मृगजळ " किंवा लहानपणी ऐकलेली " जादूची छडीच " जी अकस्मात आपल्या भावना बदलते. ओळख बदलते आणि दिवस ही बदलते. अशा वेळी ते मृगजळ पकडण्यासाठी केलेली धडपड अपेक्षाचा खूप मोठा डोंगर समोर उभा करते. हे अगदी सर्वांसाठी सारखे असू शकते. किंवा विरोधी असू शकते. समीकरण जुळते न जुळते गोष्टी हाताबाहेर जातात. अशा वेळी दोष तरी कोणाला द्यावा आणि कोणाला सांगावे अशी मनस्थिती होणे अगदी साहजिकच. यावर थोडा विचार केला तर मला वाटते,
कधी कधी आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती कधी कधी टिकवून ठेवण्याची स्पर्धा मनात सुरू असते. ती कधी कधी बदलणाऱ्या मानसिकतेला जबाबदार असू शकते. जी आजच्या युगात कामासाठी, प्रगतीसाठी धावणाऱ्या जगात खरंच शक्य आहे का ? पकडा पकडीच्या या स्पर्धेत या गोष्टीचा प्रत्येक व्यक्तीने विचार करणे गरजेचे आहे. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. कधी दोन्ही हात आपलेच असतात. म्हणजे चूक ही संपूर्णपणे आपलीच असू शकते किंवा दोन्ही बाजूने ही चुक असू शकते. असे म्हणले जाते एक चूक सतत केली की तो गुन्हा होतो पण आपण दिवसातून किती वेळा दुसऱ्याच्या ऐवजी आपली चूक मोजतो ? जग इंटरनेट मुळे जवळ आले असे आपण म्हणतो पण जवळ आले तसे जगाच्या आपल्याकडून असणाऱ्या जबाबदाऱ्या वाढल्या. आपले जग वाढले. पूर्वी मनुष्य होता. जितका वेळ काम करायचा. जितक्या माणसात त्याचे वर्तुळ होते. ते वाढले. आता नक्कीच पूर्वी इतके लहान हे वर्तुळ राहिले नाही. जर वर्तुळ वाढले तर आपल्या वर्तुळात होणारे आपले बदलते मत प्रवाह, मानसिकता कशी बरे सारखी असणार. जर एक व्यक्ती किंवा एक शरीर म्हणून जर आपण या सर्व गोष्टींचा विचार केला तर बदलत चाललेली मानवीय मानसिकता याला नक्की जबाबदार कोण याचे उत्तर नक्कीच मिळेल. जेव्हा आपण आणि आपली क्षमता आज ही तशीच पूर्वी इतकीच असताना पुढे धावतो आहोत. मृगजळ आणि जादूची छडी मिळवण्यासाठी हे कितपत योग्य आहे.
आपला पेला आज ही तितकाच आहे. आज ही त्यात तितकेच पाणी पडण्याची गरज आहे. त्याच्या क्षमतेच्या बाहेर त्यात भरत गेलो तर नक्कीच सारे वाहून जाणार. अर्थात इथे अधिकचे पाणी म्हणजे आपले अधिकचे वाढलेले वर्तुळ. आपल्या जवळचा पाणवठा जिथे आपल्या गरजेपुरते पाणी मिळत असताना तहान वाढलेली असणे. अचानकपणे त्यात ही काठ गाठणे सारे सांडून जाणे. आपला पेला आपली ही तहान भागवू शकत नाही अशी अवस्था होणे. याला फक्त एक व्यक्ती जबाबदार नसून तशी वाढत जाणारी विचार सरणी आहे असे मला वाटते.
मला वाटते याला उत्तर एकच असू शकते. आपल्या आयुष्यात सतत नव्या नव्या चेहऱ्याची भर पडत जाते. ते नाकारून चालत नाही. पण जेव्हा आपल्या जवळची असलेली व्यक्ती आपल्यासाठी तात्काळ आहे. अशा समजुतीने किमान आपण त्या व्यक्तीला महत्व द्यावे. तर नक्कीच हे चित्र बदलू शकते. " सोबत " ही आज काल ची तहान झाली आहे. पण बरेच जण त्यासाठी अधिकाधिक मोठे वर्तुळ करण्यात व्यस्त होतात. तात्काळ मिळणारा सहवासातला आनंद अशा स्पर्धेत मिळणे कठीण होते. अशा वेळी त्या दिवसाची, त्या व्यक्तीची आपल्यासाठी मिळालेली सोबत क्षणिक समजून आपले वागणे, बोलणे आणि विचार सम रूप ठेवले तर जे वाढत चाललेले fear of losing किंवा गमावण्याची भीती कमी होईल. वाढत चाललेले नैराश्य, एकटेपणा, अपेक्षांचे डोंगर आणि वाढत जाणारे घटस्फोट हे चित्र बदलणे आपल्याच हातात आहे. जादूची छडी ही आपल्याच हातात आहे ती वापरताना काळजी घेणे इतकचं आपल्या हातात आहे. जग फार मोठे असण्यापेक्षा जे जवळचे आणि वास्तविक जग आहे का याचा शोध घेणे जरुरीचे आहे. ते आपले जग मानले की जगणे सोपे होईल. कधी कधी दोऱ्यात बांधलेल्या फुलापेक्षा एकाच झाडाला लागलेला भरपूर फुलांचा भरलेला झुपका हा अधिक आकर्षक वाटतो. ते झाड त्याचे जग होते तेव्हा म्हणून असेल कदाचित.
काय वाटते...?
- जुईली अतितकर
Perfectly said
ReplyDeleteमस्त आणि अगदी खरं, प्रत्येकाला सोबत हवी असते आणि ती गमवण्याची भीतीही...सोशल मिडीयावर कितीही जवळीक दाखवली तरी मनातली सल प्रत्येकापाशी नाही बोलता येत 😊
ReplyDeleteFar sunder Kalpana Vilas aahe 💐💐💐👏👏👏
ReplyDelete